काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर [आमची वढू तुळापुर मोहीम सर्वच अर्थाने जबरदस्त झाली. काही हसरे तर काही मनाला चटका लावून जाणारे तर काही धाकल्या धन्याच्या आठवणीने मन हेलावून टाकणारे… हे सर्व अनुभव एका लेखात लिहीन मला योग्य वाटत नव्हत म्हणून मी याचे २ लेख लिहिले त्यातील पहिला "काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर" आणि दुसरा लेख "दर्शन धाकल्या धन्याच- मोहीम वढू-तुळापुर"…. यातील हा पहिला लेख तुमच्यासमोर आणतोय दुसरा लेख पुढील काही दिवसात नक्की येणार तोपर्यंत या लेखावरच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा… ] शिवजयंती चा उत्सव उत्साहात पार पडला आणि आम्ही ७ जण वढू-तुळापुर ला जाणार होतो. त्यानुसार मी, राज मेस्त्री, नितीन पाटोळे, नील मयेकर, सचिन रेडेकर, सुरज कोकितकर, मोनीश चौबळ असे ७ निघालो. मी आणि राज दादा त्याच्या घरी जेवून निघालो. दादर स्टेशन ला नितीन,सुरज,नील,सचिन अगोदर पोचले होते. रात्री ११:४५ च्या दरम्यान ट्रेन होती चेन्नई एक्स्प्रेस. ट्रेन मध्ये गर्दी नसणार आपण आरामात झोपून जाणार या विचारात आम्ही होतो. ट्रेन आली नेमका जनरल डब्बा मागे आला पुन्हा आमची धावपळ डब्बा पडा...