Posts

स्वप्नांना मिळे बळ

Image
आज सकाळी WhatsApp चालू केलं बरेच मेसेज होते त्यातील दोन मेसेज वाचून छान वाटलं. दुर्गवीर बंधू  Ravindra Raorane   आणि Preeti Mukadam   यांचे मेसेज होते. त्यांनी कुठूनतरी आज दि. २२/०५/२०१७ "महाराष्ट्र टाइम्स" च्या "मुंबई टाईम्स" पुरवणी मध्ये "माझी जागा" या सदरातील "स्वप्नांना बळ मिळे" हा माझा लेख वाचला.... लगेच त्यांनी मला फोटो काठून पाठवला.... यावेळी गावी गेलो तेव्हा अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या त्यातील ही एक जागा. ज्या जागेशी गेली वीस एक वर्ष अतूट असं नातं निर्माण झालंय त्याच्यावर गेल्या १५ दिवसांपूर्वी अचानक असं काही सुचलं आणि म.टा. ला पाठवलं. धन्यवाद म. टा. प्रतिनिधी आणि रवींद्र रावराणे आणि प्रीती मुकादम दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग https://dhiruloke.blogspot.in/
Image
एक रम्य संध्याकाळ.... स्थळ :- तांबाळडेग(मिठबाव), ता.:- देवगड, जि.:- सिंधुदुर्ग छायाचित्रकार :- Dhiraj Vijay Loke (दुर्गवीरचा धीरु) Device :- Microsoft Lumia 640 XL #Loadingकोकण #कोकण #मिठबाव #देवगड

परतीचे किरण

Image
परतीचे हे किरण  दर्याकिनारी झेपावते.... बाप-बेट्याच्या नात्याला हळुवार सुखावते.... छायचित्रकार :-   Malandkar Vishnu स्थळ :- मिठबाव(तांबळडेग समुद्रकिनारा), ता.:- देवगड, जि. :- सिंधुदुर्ग

दोन टोकं

Image
http://marathi.pratilipi.com/dhiraj-loke/don-tok मानवी स्वभाव वेगवेगळे असतात. अशा भिन्न स्वभावाची मानस एकत्र येण्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावेत. अशांच भिन्न स्वभावाच्या आदित्य आणि संयुक्ता ची सुंदर प्रेमकथा. संपूर्ण कथा वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा.... http://marathi.pratilipi.com/dhiraj-loke/don-tok

शेवया आणि नारळाचा रस

Image
शेवया आणि नारळाचा रस कोकण म्हटल की विविध खायचे पदार्थ समोर येतात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे "शेवया आणि नारळी रस" . " तांदुळ" किंवा "नाचणी" याच्या  पिठापासून या शेवया  बनवील्या जातात .  कोकणात तांदुळ मुबलक असल्याने मुख्यता तांदळाच्या पिठापासुनच या शेवया बनतात .  प्रथम तांदळाच पिठ उखळत्या पाण्यात टाकुन त्याच्या गुठळ्या फोडुन थोडस मिठ टाकुन, ते पिठ मळुन त्याचे छोटे छोटे गोळे   बनवुन घेवुन पुन्हा ते गरम पाण्यात टाकुन तसेच गरम गरम गोळे शेवया काढायच भांड(जस चकलीच असत तस) घेवुन शेवया काढाव्यात .  सोबत असणारा नारळाचा रस बनविण्यासाठी ओल खोबर किसुन घेवुन ते पिळुन त्याचा रस एका भांड्यात घ्यावा (जसा रस सोलकडीसाठी काढतात) या रसात चवीनुसार गुळ वेलची टाकावी जेणेकरुन एक गोडवा आणि चव येते .  यातील वेलची थोडिफार पचनासाठीही मदत करते .   या नारळी रसात शेवया टाकुन खाव्यात .  या शेवया पचनासाठी थोड्या जड असतात त्यामुळे शक्यतो सकाळी सकाळीच खाव्यात माहिती व छायाचित्रासाठी खास आभार  :-  Shweta Sawant दुर्गवीर  चा  ...

लोकलच्या गजाली

ट्रेन मध्ये "हेडफोन" लावण्याचे दोन फायदे...... १)गाणी ऐकता येतात २)गेट वरच्या "टग्यांच्या" शिव्या ऐकू येत नाहीत #लोकलच्या_गजाली दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग https://dhiruloke.blogspot.in/

देव्या चा Birthदिवस

Image
देवेश अरविंद सावंत उर्फ देव्या उर्फ AK47, अजून बरेच उर्फ असावेत. याच्याकडे चर्चा, प्रतिचर्चा, उपचर्चा, महाचर्चा अशी गुऱ्हाळ केली जात नाहीत. देव्या स्वतःच पोलीस आणि स्वतःच न्यायाधीश. एक घाव ५-५० तुकडे...... शरीर काटक दिसलं म्हणून त्यावर जाऊ नका "Confidence" पुरेसा आहे समोरच्याची बोलती बंद करायला. "धीरु भाय" म्हणून मला हाक मारणारा देव्या स्वतःच एक "भाई" म्हणून प्रसिद्ध आहे. असा हा ब्रिगेडींचा कर्दनकाळ देव्या भाई....... ह्या झाल्या देव्याच्या स्वभावातील "ओबड-धोबड" बाजू पण उत्तम फोटोग्राफर आणि Editor सुद्धा... संतोष दादांनी काही सांगितलं की दादा तू फक्त बोल म्हणून हाकेला ओ देणारा आणि "कट्टर शिवसैनिक" देवेशचा आज "तारखेनुसार" जन्मदिवस तेव्हा तिथी नुसार पुन्हा शुभेच्छा देऊ तोवर ह्या "गॉड" मानून घ्या ता.क. :- भाईंचे "गुण" थोडेफार या छोट्याने घेतलेत हे त्याच्या चेह-यावरून स्पष्ट दिसतय.... दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग https://dhiruloke.blogspot.in/