Posts

PROUD TO BE AN INDIAN

Image
काय रे हे दुर्दैव ... आजची आमची मुल गणतंत्र दिवस म्हणजे Independence Day अस सांगतात आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या पोकळ गप्पा मारतात ! काय रे हे दुर्दैव ... आजची आमची मुल एखाद ऐतिहासिक चॅनल "कंटाळवाण" म्हणुन बदलतात पण "कार्टून नेटवर्क" मात्र न चुकता लावतात! रे हे दुर्दैव ... आजची आमची मुल "LOC Kargil" चित्रपट पहायला कंटाळतात पण "वीर-झारा" अगदि मन लावुन पाहतात ! काय रे हे दुर्दैव ... आजची आमची मुल "ये मेरे वतन के लोगो" ला रडव म्हणुन चिडवतात पण "पोरी जरा जपुन दांडा धर" या गाण्यावर बिभित्सपणे नाचतात ! काय रे हे दुर्दैव ... काय रे हे दुर्दैव ... दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- राजा पुष्यमित्र

Image
हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- राजा पुष्यमित्र सम्राट अशोका नंतरच्या काळातील मौर्य राजा बृहद्रथ हा मिन्यांडर च्या आक्रमणाचा फारसा प्रतिकार करीत नसल्याचे शल्य अनेकांच्या मनात होते कदाचीत याच कारणास्तव बृहद्रथ मौर्याचा भर सभेत शिरच्छेद करण्याचा एक कट रचण्यात आला. या कार्याची पुर्तता केली ती बृहद्रथ मौर्य च्या सेनापतीने. ई.स.पु.१८४ च्या आसपास हि घटना घडली. शुंग वंशाच्या पुष्यमित्रने भर सभेत बृहद्रथ मौर्य चा शिरच्छेद करुन मौर्य साम्राज्याचा अंत केला. कदाचित जनतेच्या व सैनिकांच्या मनात बृहद्रथ मौर्य बद्दल रोष असल्याने पुष्यमित्राच्या या कृत्याचा विरोध झाला नाहि उलट पुष्यमित्रला सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळाला.तब्बल ३६ वर्ष राज्य केल्यावर ई.स.पु.१४९ व्या वर्षी आपला देह ठेवला !! माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर सावरकर छायचित्र स्त्रोत :- Internet दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

लोकमान्य.....

Image
लोकमान्य!! अप्रतिम दिग्दर्शन, अप्रतिम अभिनय, अप्रतिम नेपथ्य,अप्रतिम साऊंड अश्या विशेषनांनी गौरविला असाच हा चित्रपट.. आजच्या पिढिने आजच्या युगात लोकमान्यांचे विचार कसे आचरणात आणावे हे सुबोध भावे व चिन्मय मांडलेकर ह्या दोन उत्कृष्ट कलाकारांनी दाखवुन दिले!! गांधी हम पच्चीस साल से ब्रिटिशोंसो लढ रहे है ! जिस स्वराज्य कि लढाई मे खुन ना बहे उस स्वराज्य की कोई किंमत नहि होती !! या सारखे संवाद अंगावर रोमांच उभे करतात आणि मनात खंतहि निर्माण होते इतक्या दुरदृष्टिच्या नेत्याला आपण विसरतोय !! "आजकाल चला आपण देश घडवुया या वाक्यावर लोक संता-बंताचा जोक सांगितल्याप्रमाणे हसतात" हा संवाद मी इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा माझ्या काहि निवडक मित्र मंडळिंची प्रतिक्रिया अशीच असल्याचे जाणवते !! संपूर्ण इंग्रज राजवटिला टिळकांना संपविणे जमले नाहि त्या टिळकांचे विचार संपविण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न आपल्या देशात होतोय ! प्रत्येक तरुण-तरुणी ने हा चित्रपट एकदा नक्कि पहावा टिळकांचे विचार समजुन घेण्यासाठि आणि टॅाकिज मध्ये जावुन पहावा माय-मराठिच्या उद्धारासाठि !! दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http...

हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल"

Image
हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल" सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर दहा एक वर्षात अशोक वंशीयांचे आधिपत्य नाकारुन स्वताचे राज्य स्थापणा-या दाक्षिणात्य राज्यातील आंध्र व ओरिसा(कलिंग) राज्यांपैकि कलिंग चा राजा म्हणजे सम्राट खारवेल. डेमेट्रियस (ग्रिक)सैन्याचा संपूर्ण हिंदुस्थानात कोणीहि प्रतिकार करत नसताना राजा खारवेलने शस्त्रसज्ज सैन्यासह अयोध्ये च्या आसपास च्या परिसरात आक्रमण करुन हिंदुस्थानच्या पर्वत सिमेपार पाठविले. कलिंगात या विजयाप्रित्यर्थ राजसुय यज्ञाचे आयोजन करण्यात आले ४०-५०वर्षातला तो सर्वात मोठा यज्ञ समजला जातो. संपूर्ण हिंदुस्थानात निशस्त्रीकरणाचे वारे वाहत असताना क्षात्रतेज जागविणारा राजा म्हणुन खारवेल चा उल्लेख करायला हवा. खारवेल चे डेमेट्रियस ग्रिकांवरील आक्रमण ही क्रांति होती ज्याच्या बळावर पुढे मिन्यांडर ग्रिकांवर आक्रमण करुन त्यांना हिंदुस्थानबाहेर हाकलुन लावण्यासाठि व हिंदुस्थानातुन ग्रिकांचे नामोनिशान मिटवुन टाकण्यास उपयुक्त ठरली. माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर सावरकर छायचित्र स्त्रोत :- Internet दुर...

खरी लढाई

Image
दुस-याला "बाजूला करण्यासाठी" "लढण्यापेक्षा", "दुस-याच्या बाजूने" "लढून" पहा…. दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार

Image
हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार "सम्राट चंद्रगुप्त" व "ग्रीक राजा सेल्युकस" ची राजकन्या यांचा विवाह झाला व त्यांचाच पुत्र "बिंदुसार". ई.स.पू. २९८ ला "चंद्रगुप्त" मरण पावला व "बिंदुसार" त्या गादीवर बसला. "बिंदूसार" हा पित्याप्रमाणे महाराक्रमी होता. त्याने "चंद्र्गुप्ताचे" अखंड हिंदुस्थान चे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरु केली होती. उत्तर हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केल्यावर त्याने दक्षिण स्वारी केली आणि तिथेही आपले राज्य प्रस्थापित केले. त्याच्या पराक्रमाने त्याचे शत्रू त्याच्या विरोधात उभे राहत नव्हते. त्याच्या याच पराक्रमाने त्याला "अमित्रघात" म्हणजेच "शत्रूंचा कर्दनकाळ" हि पदवी मिळाली होती. त्याने उत्तर - दक्षिण - पूर्व - पश्चिम अश्या संपूर्ण हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केले होते. पूर्व नि पश्चिम समुद्राच्या मध्यांतरीच्या तब्बल १७ राजधान्या "मौर्य साम्राज्यात" सामील करून घेतल्या असा उल्लेख ग्रंथातून आढळतो. "सम्राट ...

संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय?

Image
संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय? आपण आपले मराठी कॅलेंडर निट पाहिले तर "शालीवाहन शके 1936" किंवा "विक्रम संवत् 2071" वगैरे दिसेल हे नक्की काय असते आणि याची उत्पत्ती कुठून झाली हे आपणांस कदाचीत माहीत नसेल. यावर्षीच - 2014च कॅलेंडर निट पाहिले तर लक्षात येते की, "गुढिपाडवा" "31 मार्च 2014" रोजी "शालीवाहन शके 1936 प्रारंभ" असे आहे. "दिपावाली पाडवा" "24 ऑक्टोबर 2014" रोजी "विक्रम संवत् 2071 प्रारंभ" असे आहे. म्हणजे "शालिवाहन शक" "येशु ख्रिस्त" च्या नंतर सुरू झाले व "विक्रम संवत्" हे "येशु ख्रिस्ताच्या" अगोदर सुरू झाले. संवत् / सवस्तर / शक म्हणजे एखाद्या राजाने त्याने केलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून त्या दिवासापासुन नविन वर्ष सुरू करणे. प्रथम "शक" हा शब्द "संवत् / संवस्तर" यासाठी पर्यायी "परकिय शब्द" आहे. इतिहासात उपलब्ध नोंदिनुसार आजवर टिकलेले काहि संवत् उपलब्ध आहेत :- 1. कृत किंवा मालव 2. विक्रम 3. शालिवाहन > ई.स. पूर्व 5...