Posts

प्रेम म्हणजे

Image
प्रेम म्हणजे काय असते हे काही चार दिवसांसाठी नसते यात सारे जीवन गुंतवायचे असते तरच तुमचे प्रेम खरे असते....... दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

मैत्री आपली

Image
मैत्री आपली जमल तर जमवून घेते नाही जमल तरी जमविण्यासाठी धडपडते जमेल तितकी ओंजळ भरून देते  तीच मैत्रीची ओंजळ आयुष्यभराच सुख देते दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

प्रेम

Image
तुला प्रेम देण्यात माझा हेतू स्वच्छ होता... तू घेताना चुकलीस, यात माझा काय दोष होता....... दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग  http://dhiruloke.blogspot.in/

उठ हो जागी तू रणरागिनी

Image
उठ हो जागी तू रणरागिनी  शंभू महादेवाची तू अर्धांगिनी  कालीमातेचे रूप घेवूनी  टाक या राक्षसांसी ठेचुनी हतबल नाहीस तू  दुर्बल नाहीस तू  झाशीची कधी राणी होतीस तू  ताराबाई होवोनी स्वराज्य रक्षीलेस तू  जे विसरती सीमा माणुसकीची  करिती थट्टा तुझ्या स्त्रीत्वाची  होवोनी धार या भवानीची  कर कत्तल त्या शत्रूंची घडविण्या शिवबांसी  तू हो जिजाऊ  महारुद्र शंभू उभारण्या  हो धारक्का दुधाउ दुर्गवीर चा धीरु  माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

कसला रे हा तुझा पुरषार्थ..

Image
कसला रे हा तुझा पुरषार्थ  पुरुष म्हणून जगलास तर त्याला अर्थ पूर्ण करण्यास तुझ्या वासनेचा स्वार्थ हिरावतोयस तू स्त्रीच्या जीवनाचा अर्थ वासना हि तुझी सोडतेय पातळी  कुणा स्त्रीचे आयुष्य पडतेय त्यास बळी  पडताच तुझी हि नजर काळी   भयंकर शिक्षा थोपतोस तिच्या कपाळी संत महात्म्यांच्या या पवित्र भूमीत काय हे घडतेय विपरीत पुरुष म्हणोनी मिरवतोयस या जगात पण राक्षसीपणा का तुझ्या कर्मात स्त्रीचे रक्षण असे तुझ्या हाती  पण का विसरलास तू सारी नाती निर्मळ मनाने बघ तू सभोवती अन जप हि सारी आयां  बहिणीची नाती  पुराणात हि स्त्री असे देवीसमान का करतोय या दैवत्वाचा अपमान ठेवतोय तू तुझी बुद्धी गहाण अन करतोयस तू या स्त्री शक्तीस आव्हान  विसरू नको रे ती कालीमाता  जी संपवे राक्षसांसी स्वत:  पापाचा तुझ्या घडा हा भरता संपवेल हि तुला ती रणरागिणी आता दुर्गवीर  चा धीरु  माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/    

का असा स्वार्थ पाहिला....

Image
का असा स्वार्थ पाहिला.... हे मानवा का असा स्वार्थ पाहिला......... माणुसकी आज ना राहिली नावाला जो येई तो सावरे स्वतःला  जन्मभर स्वार्थाने बरबटलेला  मरणोत्तर कोण रडे कशाला हे मानवा का असा स्वार्थ पाहिला......... दया माया करण्यासी तू हुकला  जीवनाच्या वाटेवर आज तू चुकला  मोह मायेत कसा तू झुकला  झुकत झुकत कसा तू प्राणास मुकला  हे मानवा का असा स्वार्थ पाहिला......... वासनेतूनी विसरलास तू माणुसकी  अखेर ना काही राहिले बाकी  सरताच संपत्तीची लकाकी  येते उपयोगास माणुसकी  हे मानवा का असा स्वार्थ पाहिला......... मोह माया असे क्षणभंगुर  माणुसकीपुढे होते जणू लंगुर  जेथे उगवे माणुसकीचा अंकुर  स्वार्थ मोह माया होई इथे क्षणभंगुर दुर्गवीर  चा धीरु  माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

दुर्गवीर....

Image
धन्य धन्य जाहले जीवन माझे मी जन्मलो मराठी... त्या उपरी कळस म्हणोनी, मी वाढलो मराठी... सोनियाचा कळस जणू तो कि मी भेटलो दुर्गवीरांसी.. दुर्गवीर चा धीरु