रानभुली ची राणी....

रानभुली ची राणी.... कधी कधी खुप “महान” असलेल व्यक्तिमत्व अगदि “साधेपणाने” तुमच्या समोर येत आणि आपल्यातला बडेजावपण, अहंकार नष्ट होवुन त्या व्यकतीच्या चरणांवर डोक ठेवावस वाटत..... छायचित्रात दिसणा-या आज्जी या कोणी सामान्य व्यक्तिमत्व नाहिय. या आहेत "मनू आज्जी" म्हणजे गो. नि. दांडेकर यांना रायगड दाखवणारी याच त्या "रानभुली च्या नायिका" या आज्जींवर गो. नि. दांडेकरांनी "रानभुली" सारखी कादंबरी लिहिली. दि.२० नोव्हेंबर २०१६ या दिवशी दुर्गवीर रामजी कदम यांनी या आज्जींच घर दाखवल लागलीच आम्ही त्यांच्याकडे गेलो पण काहि कामानिमित्त त्या बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या घरच्यांशी बोलतोय इतक्यात आजी तिथे आल्या. झपझप पडणारी पावलं आणि अंधारात चमकणारे तेजस्वी डोळे असं हे व्यक्तिमत्व समोर आलं आणि क्षणभराचा विलंब न लावता आम्ही एक एक करुन आज्जींच्या पाया पडलो. अक्षरशः मन शहारुन आल एखाद्या पिक्चर च्या हिरोला पाहिल्यावर एक वेळ काहिच वाटणार नाही पण त्या क्षणाला त्या आज्जींना पाहिल आणि नकळतच पायावर डोक ठेवायची इच्छा झाली. जी पावल अगदि १० एक वर्षाची असताना गो. नि. द...