हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल"
हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल" सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर दहा एक वर्षात अशोक वंशीयांचे आधिपत्य नाकारुन स्वताचे राज्य स्थापणा-या दाक्षिणात्य राज्यातील आंध्र व ओरिसा(कलिंग) राज्यांपैकि कलिंग चा राजा म्हणजे सम्राट खारवेल. डेमेट्रियस (ग्रिक)सैन्याचा संपूर्ण हिंदुस्थानात कोणीहि प्रतिकार करत नसताना राजा खारवेलने शस्त्रसज्ज सैन्यासह अयोध्ये च्या आसपास च्या परिसरात आक्रमण करुन हिंदुस्थानच्या पर्वत सिमेपार पाठविले. कलिंगात या विजयाप्रित्यर्थ राजसुय यज्ञाचे आयोजन करण्यात आले ४०-५०वर्षातला तो सर्वात मोठा यज्ञ समजला जातो. संपूर्ण हिंदुस्थानात निशस्त्रीकरणाचे वारे वाहत असताना क्षात्रतेज जागविणारा राजा म्हणुन खारवेल चा उल्लेख करायला हवा. खारवेल चे डेमेट्रियस ग्रिकांवरील आक्रमण ही क्रांति होती ज्याच्या बळावर पुढे मिन्यांडर ग्रिकांवर आक्रमण करुन त्यांना हिंदुस्थानबाहेर हाकलुन लावण्यासाठि व हिंदुस्थानातुन ग्रिकांचे नामोनिशान मिटवुन टाकण्यास उपयुक्त ठरली. माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर सावरकर छायचित्र स्त्रोत :- Internet दुर