दर्शन शिवजन्मभूमीचे

दर्शन शिवजन्मभूमीचे… दि. ११/८/२०१३ रोजी आम्ही दुर्गवीर पुणे येथे एका बैठकीसाठी गेलो होतो. तसे आम्ही वेळेत निघालो, पण काही तांत्रिक कारणास्तव आम्ही साधारण ११ ते १२ पर्यंत जुइनगर रेल्वे स्टेशन ला बसून गप्पा मारत होतो ("मह्या" चा "महिमा" बाकी काय). अगदी पोटभर गप्पा मारून झाल्यावर आमचा "मह्या" प्रकट झाला. आम्ही दाटीवाटीने गाडीत जागा पटकावली ("व्याकि" ची रिस्क नको म्हणून मी खिडकी पटकावली ) पुढच्या प्रवासाची दिशा ठरली होती प्रथम सचिन जगताप बंधूंच्या घरी विश्राम मग पुढे एक बैठक आटोपून एक गडदर्शन. तोवर सचिन बंधु फोन करून आम्ही कुठे आहोत याची खात्री करून घेत होतो. पण आम्ही पहाटे पुण्यात पोचणार होतो त्यामुळे त्यांना आम्ही झोपायचा सल्ला दिला त्यानंतर आम्ही जवळपास सर्वच चिंतनात मग्न झालो. मध्येच एके ठिकाणी काळोखातील फ्राईड राइस खाउन पुढचा प्रवास सुरु झाला. शेवटी एकदाचे पहाटे पहाटे सचिन बंधूंच्या घरी पोचलो. त्यांच्या एका खोलीत आम्ही सर्व जागा मिळेल तसे आडवे तिडवे झोपी गेलो. सकाळी ७च्या दरम्यान झोपेतून उठविण्याची ...