तीन दिवस…. तीन विषय....... तीन विभुती...... तीन अनुभव.....
इतिहासाच एक वादळ जे ७८ व्या वर्षीही घोंगावतय. ज्या वादळाला कुणी एका बंधनात बांधुन ठेवु शकत नाही…. ते वादळ घोंगावत जात…… आता तुमचा मजबुत पाया ठरवतो की तुम्ही त्या वादळासमोर कसे टिकता. तुम्ही मातीशी पाय घट्ट रोवुन असलात म्हणजे तुम्ही या वादळासमोर तग धरु शकता. हे वादळ म्हणजे श्री आप्पा परब….. आप्पांनी बोलत जाव मुक्तपणे आणि आपण घेत जाव जितकी आपली पात्रता आहे. ७८ व्या वर्षी रायगड चढुन जाताना व्यक्त होणारे आप्पा परब खर तर दोन तासाच्या कार्यक्रमात व्यक्त होणं म्हणजे मृग नक्षत्रातल्या एकुण पावसातला एक थेंब जणु... डॉ. परीक्षित शेवडे आयुर्वेद चे खरे वैद्य अगदि सोप्या भाषेत सांगायच तर आयुर्वेदाचे डॅाक्टर... WHATSAPP वरच्या आयुर्वेद व इतिहास या विषयांवरच्या अंगठेबहाद्दरांचा खरपुस समाचार घेत दोन तास चांगलेच गाजवले. छत्रपति संभाजी महाराजांच्या युद्धनितीबद्दल अगदि हलक्या फुलक्या भाषेत डॅा. परिक्षीत शेवडे यांनी सांगितले. वय वर्ष २६ अस म्हटल्यावर सभागृहाने टाळ्या वाजविल्या त्या कौस्तुभ कस्तुरे यांनी गाजवला तिसरा दिवस. बाजिराव मस्तानी आणि अटकेपार झेंडा या पलिकडे पेशवे हे फारसे परिच