Posts

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

Image
"श्रेय" मिळण्यासाठी  "काम" करणे  म्हणजे "स्वार्थ" "कामाचे" "चीज"  होण्यासाठी "झटणे"  म्हणजे "परमार्थ" दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

माझी एक शाळा होती……

Image
माझी एक शाळा होती…… जीच्या विषयी मनात हूरहूर होती, जिथे गुरु शिष्याची अतूट नाती होती, फटकळ असूनही आपुलकीची होती म्हणून अजोडपणाच्या गाठीत होती - १ माझी एक शाळा होती…… जिथे सकाळी दोघांची हातघाई होती तिथे दुपारला दिलजमाई होती मैत्री अतूट रहावी म्हणून मैत्रीत एक नरमाई होती - २ माझी एक शाळा होती…… जिथे बाईंच्या ओरडण्यावर, गप्प बसण्याची शिष्टाई होती जिथे गुरुजींच्या डोळे वटारण्यावर, मान झुकाविण्याची नरमाई होती - ३ माझी एक शाळा होती…… जिथे परीक्षा आली तोंडावर, कि अभ्यासाची घाई होती. अखेरच्या मिनटात अभ्यास उरकून, पास होण्याची कलाई होती. - ४ माझी एक शाळा होती…… जरी दूर असली घरापासून, मनाच्या गाभा-यातील होती संस्काराच्या कठोर घावांनी मूर्ती घडविण्याची "ती"ची किर्ती होती - ५ माझी एक शाळा होती…… हरवलीय ती आज कुठेतरी शोधून देईल का कुणीतरी पैश्याच्या या नादापायी, गमावून बसलोय तिला खरोखरी    - ६ माझी एक शाळा होती…… माझी एक शाळा होती…… दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/ First Published in Uddan Annual Mag...

"हिरा"

Image
"मी" एकटा आहे…………. कारण "हिरा" तोवर एकटा असतो जोवर त्याला साजेशी "अंगठी" मिळत नाही दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

चांगुलपणा....

Image
जोवर तुम्ही इतरांच वाईट करत नाही तोवर तुमच वाईट होणार नाही… याची जेव्हा प्रचीती येते तेव्हा "चांगुलपणावरचा" विश्वास वाढतो दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

रणरागिणी

Image
होतील संस्कार शिवबास जागूनी घडतील तेज तर्रार रणरागिणी…………. दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/ Photo Courtesy:-   https://www.facebook.com/ sudesh.renuse

"१ मे महाराष्ट्र दिन "

Image
"महाराष्ट्र" या अद्भुत सह्याद्रीचे एक रूप……… जितके सुंदर तितकेच रौद्र. या मातीत जितके संत-महात्मे जन्माला आले तितकेच जीव हातात घेऊन लढणारे वीर पहिले. महाराष्ट्राच्या "संयुक्त महाराष्ट्र" च्या चळवळीत उभ्या देशाने याची देही यांची डोळा पाहिली कि "मातीसाठी हुतात्मा" होणे म्हणजे काय? या महराष्ट्राच्या मातीतील १०६ वीरांनी आपले प्राण तळहातावर घेऊन महाराष्ट्र स्वतंत्र केला. १ मे १९६० हाच तो दिवस ज्या दिवशी या १०६ वीरांचे हौतात्म्य फळाला आले व आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. या १०६ हुताम्यांना भावपूर्ण आदरांजली…. व सर्व महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्रदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा…. जय महाराष्ट्र जय शिवराय दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/ मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे २१ नोव्हेंबर १९५५ / १६, १७, १८, १९, २० जानेवारी १९५६ १] सिताराम बनाजी पवार २] जोसेफ डेव्हिड पेजारकर ३] चिमणलाल डी. शेठ ४] भास्कर नारायण कामतेकर ५] रामचंद्र सेवाराम ६] शंकर खोटे ७] धर्माजी गंगाराम नागवेकर ८] रामचंद्र लक्...

Smile Please......

Image
तोंडावरचा ताबा सुटला कि  माणूस  तुटतो  आणि  हातावरचा ताबा सुटला कि  माणूस  फुटतो दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/