काय रे हे दुर्दैव…. (इतिहासाची अवहेलना)

काय रे हे दुर्दैव…. गुढिपाडव्याच्या आदल्या दिवशी शंभु राजांनी मृत्युला कवटाळले, मुळात जो मृत्यु कुणासाठिही थांबत नाही त्या मृत्युला शंभु राजांनी अक्षरश: रोखुन धरल. स्वत:स बादशहा समजणा-या औरंगजेबाची किव करत आणि संपुर्ण स्वराज्यात संघर्षाची मशाल पेटवत शंभु राजे नावाचा एक वणवा शांत झाला. शंभु राजे आयुष्यभर स्वराज्यासाठि वणव्याप्रमाणे अक्षरश: जळत राहिले ज्याची उब अख्या हिंदुस्थानाने पुढची अनेक वर्ष अनुभवली पण या ज्वलंत योध्याची जाणिव मात्र फार कमी लोकांनी ठेवली. आज वढु सारख्या ठिकाणी पिकनिकसाठी जाणारे महाभाग पाहिले की शंभु राजेंची हात जोडुन माफी मागाविशी वाटते. संभाजी महाराजांच्या नावाने ३० पानांत इतिहास शिकविणा-यांना उलट लटकवुन फटके द्यावेसे वाटतात! रत्नागिरी > संगमेश्वर येथे शंभु राजांसारख्या सिंहाच्या छाव्याला दगा करुन पकडलं . आज त्या ठिकाणी एक पडका वाडा आहे. बाजुला अत्यंत प्राचीन अशी मंदिर आहेत स्थानिकांच्या आख्यायिकेनुसार अशी ३६० मंदिर सभोवतालच्या परिसरात आहेत, सध्यस्थितीत फक्त ४ मंदिर शिल्लक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हि मंदिर कुणी "सरदेसाई" नावाच्या व्यक्त...