झोकात पुनरागमन:- ३०/११/२०१४ :- सुरगड श्रमदान मोहीम

"झोकात पुनरागमन" अगदी असच वर्णन करायच दुर्गवीर च्या आजच्या "सुरगड श्रमदान मोहीम ३०/११/२०१४" च्या मोहिमेचे. "महिन्यातील १ रविवार १ श्रमदान" पण अगदी झोकात… प्रदीप पाटलांचे झोकात पुनरागमन, नवीन दुर्गवीरांचे झोकात आगमन, प्रज्वल पाटील आणि पनवेलच्या दुर्गवीरांचे दणकट आगमन, तुषार चित्ते आणि अनिकेत कस्तुरे यांचे झोकात आगमन या आणि अनेक गोष्टीनी परिपूर्ण अशी आजची दुर्गवीर ची मोहीम…तबल २५-३० दगडी पाय-या बांधून काढल्या त्याही त्यावर "Disco Dance" केला तरी तुटणार नाहीत अश्या. प्रदीप पाटील बंधूच्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा पुरेपूर वापर करून पाय-या अक्षरशा बांधून काढल्या फक्त सिमेंट वापरल नाही इतकच…. अगोदरच मी लेट झालो त्यामुळे मला दिवा- रोहा ट्रेन चुकली तरीही प्रज्वल बंधू आणि त्यांच्या पनवेल मित्रमंडळ परिवाराने "मोठ्या मनाने" "माझ छोटस" शरीर Adjust करून घेतलं(कोंबून म्हटलं तरी चालेल…. ) कंपनी जी गाडी ४ माणसांसाठी बनवली त्यात आम्ही ७ जण Adjust झालो होतो. रात्री मी डबा घेऊन येणार म्हणून अर्धपोटी आणि क्वचित उपाशी झोपी गेलेल्या दुर्गवी...