माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस….

माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस…. इतिहासाचे अवघे एक ग्रंथालय माझ्या शेजारी स्थानापन्न होते आणि ओघव वक्तृत्व शैलीने येणा-या प्रत्येक व्यक्तिला मंत्रमुग्ध करून टाकणारे एक अचाट व्यक्तिमत्व…निमित्त होते शिवगौरव महोत्सव - २०१३ (ठाणे) आमच्या दुर्गवीर परिवाराच्या गडसंवर्धन मोहिमांचे छायचित्र प्रदर्शन या कार्यक्रमात होते. आम्हा दुर्गवीरांचे अहोभाग्य हेच कि आमच्या अगदी बाजूलाच श्री आप्पा परब यांचे पुस्तक विक्री केंद्र होते येणा-या शिवप्रेमींना श्री आप्पा परब इतिहास उलगडून सांगत होते. आणि तिथे असणारा प्रत्येकजण मंत्रमुग्ध होत होता. इतिहासाविषयी जाणून घेऊन लिहिणारे खूप लेखक आहेत परंतु इतिहास जगून त्यावर लिखाण करणारे श्री. आप्पा परब…. श्री आप्पा परब म्हणजे ज्ञानाचे एक सर्वोच्च शिखर, जे कितीही सर करा अधिकाधिक तुम्हाला त्यात गुंतवत जाईल. श्री आप्पा परब एकदा एखाद्या विषयावर बोलायला लागले कि आपण फक्त ऐकत राहायचे. श्री आप्पा परब म्हणजे ज्ञानाचा एक अखंड झरा कि ज्याला पाझर फुटला कि तो अविरतपणे वाहत असतो. शनिवार अर्धा दिवस आम्ही दुर्गवीर श्री आप्पा परब यांच्...