अभेद्य अन अफाट मी

अभेद्य अन अफाट मी या निळ्याशार सागरात वसे अथांग या सागरचा जणू सोनेरी मुकुटच भासे जखडू पाही सागर हा मजसी चहो बाजूनी अंगरक्षक भासे मजसी फेसाळलेले हे निळेशार पाणी पोलादी चिलखत भासती हे चहु बाजूंचे बुरुजकडे हिम्मत ना होई शत्रूची एकवार पाहण्याची मजकडे हिंदी महासागरात उभारलोय मी उभ्या महाराष्ट्राची शान मी मालवणात वसलोय मी गड सिंधुदुर्ग म्हणून परिचित मी http://dhiruloke.blogspot.in/