कोकणी भात बोकणी....

कोकणी भात बोकणी.... हे वाक्य फार पुर्वीपासुन ऐकत आलो पण त्याचा अर्थ आता उमगतोय. महाराष्ट्रातील इतर प्रांतात जेवढा भात वर्षाला खातात तेवढा भात कोकणी माणुस महिण्याला खातो(ही अतिशयोक्ती नाही बरं...) पण भातच का ? चपाती, भाकरी, किंवा अजुन का नाही याला कारण अनेक आहेत १. कोकणात तांदुळ हे उत्पादन सहजतेने येणारे उत्पादनआहे. त्याला पण मेहनत लागते हा. नाहितर सहजतेने म्हणजे अगदि रान उगवल्यासारख तांदुळ उगवत नाहि मळ्यात. २. चपातीसाठी लागणारा गहु क्वचितच कोकणात पिकतो किंबहुना पिकतच नाहि. याला बरीच नैसर्गिक किंवा आर्थिक कारणे असु शकतात. ३. कोकणातील वातावरण हे समुद्रकिणा-यावरील उष्ण असे आहे ह्या वातावरणात चपाती किंवा भाकरी पेक्षा भात शरिरासासाठी हलका असतो. याच अजुन एक उदाहरण म्हणजे दक्षिण भारतात जास्त करुन तांदळाचे पदार्थ बनविले जातात कारण तिथल आणि कोकणातील हवामान जवळपास सारखच आहे. आणि हे स्पष्ट करणारा दुवा म्हणजे "समुद्रकिनारा" ४. पुर्वापार कोकणात बनविण्यात येणारे खाद्यपदार्थ हे त्या भागात येणा-या उत्पादनावर अवलंबुन आहे. तांदळापासुन पोहे, घावणे अगदि कनीपासुन भाकरी सुद्धा बनविल...