ज्ञानभाषा मराठी

ज्ञानभाषा मराठी लाभले आम्हास भाग्य बोलते मराठी...... खरच प्रत्येक मराठी माणसाच भाग्य आहे की त्याला वैभवसंपन्न मराठी भाषा बोलण्याची संधी मिळालीय... आज गुढिपाडव्याच्या निमित्ताने डोंबिवली येथे सुचीकांत वनारसे यांनी स्थापन केलेल्या "ज्ञानभाषा मराठी" समुहाच्या रथासोबत गुढिपाडवा प्रभात फेरीत सहभाग घेतला, तेव्हा प्रकर्षाने जाणवल की "ज्ञानभाषा" मराठी का असावी किंवा मातृभाषेतुनच शिक्षण का असावं ?? रथ यात्रेदरम्यान वृषाली ताई आणि प्रियंका ताई ज्या उत्साहाने बोलत होत्या तो उत्साह पाहुन त्यांची या विषयाबद्दलची तळमळ जाणवत होती. "मराठी चा आग्रह" हा मुद्दा तर होताच पण "मातृभाषेतुन शिक्षण" हा मुद्दा मला जास्त भावला. मराठितुनच शिक्षण घ्यायला हवे हा मुद्दा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिल पण मातृभाषेतुन शिक्षण हा मुद्दा कदाचित देशव्यापी असु शकतो किंबहुना तो देशव्यापी व्हावा कारण मातृभाषेतुन दिलेले शिक्षण हे बाल्यावस्थेत आकलनासाठि सर्वात सोपे असते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाल आहे. इंग्रजी भाषेचे माजलेले स्तोम आज प्रत्येक मातृभाषेला गिळंकृत करीत आहे त्यासाठी...