तपस्वी...

तपस्वी... चेहरा निर्वीकार... उर्जा "प्रचंड" या शब्दा पलिकडची !! धेय्य "इतिहासाचा प्रचार आणि प्रसार" !! छायचित्रातील या व्यक्तिच्या नावातच इतिहास दडलाय ! ! "किरण शेलार" श्री किरण शेलार दादांशी पहिली भेट आजच(१६ /८/२०१५) झाली !! वेळ उंबरखिंड दर्शन मोहिम खंडाळा पासुन डोंगर द-यातुन उंबरखिंडिच्या या परिसरातील प्रतिकात्माक स्मारकापर्यंतचा प्रवास... संपुर्ण प्रवासात किरण दादांनी त्यांच्या बोलण्यातुन इतिहास अक्षरशः डोळ्यासमोर जिवंत केला ! दुतर्फा पसरलेल्या सह्याद्रिकडे पाहिले की जणु खानाला घेरण्यासाठी शिवरायांनी नेमलेल्या ४ तुकड्यांमधील मी एक मावळा असल्याचा सतत भास होत होता. सभोवतालचा सह्याद्रि सतत साद देत होता !! या सुवर्णक्षणांची भेट दिली ती किरण दादांनी !!! गेली १५ वर्ष उंबरखिंड मोहिमेचे आयोजन किरण दादा करतात. कोणतेही व्यावसायीकीकरण वा गाजावाजा न करता या मोहिमेचे आयोजन केले जाते! ! ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण असणा-या उंबरखिंडीचा इतिहास सर्वसामान्यांपर्यत पोचावा हा एकमेक भाबडा आशावाद डोळ्यासमोर ठेवुन दादा या मोहिमेचे आयोजन करतात ! माझ्यासोबत आलेल्याने दुस-या...