शिवजयंती..... तिथी नुसार कि तारखेनुसार...

काल १९ फेब्रुवारी!! "तारखेप्रमाणे" शिवजयंती साजरा करण्याचा दिवस ! दिवसभर मेसेज, फोटो चा नुसता पाऊस पडत होता ! दर वर्षीपेक्षा या वर्षीच्या शिवजयंतीला "ठळकपणे" जाणवत होत सर्वांच "शिवप्रेम"... यात तिन प्रकारचे शिवभक्त असल्याचे मला जाणवलं. एक जे शिवजयंती "तारखेप्रमाणेच" साजरी करा असा आग्रह करणारे आणि त्यासाठी तिथिप्रमाणे शिवजयंती करणा-यांना तिव्र विरोध करणारे ! दुसरे जे शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करावी असे मानणारे आणि तारखेप्रमाणे शिवजयंती करणा-यांचा तिव्र विरोध करणारे ! तिसरे ज्यांना तारिख आणि तिथी यात नेमका वाद काय आहे ! हा वाद कोण आणि का करतय याचा मागमुस नसताना फक्त शिवरायांच्या विषयीच्या "आंधळ्या प्रेमापोटि"(हो ! आंधळ्याच) समोर आलेला मेसेज पुढे पाठवून आपले "भाबडे" शिवप्रेम व्यक्त करणारे यात तारखेप्रमाणे शिवजयंती करणारे चुक की तिथी प्रमाणे चुक हा मुद्दाच नाहिय ! मुद्दा हा आहे की ज्यांना नेमका हा वाद काय आहे आणि कोण करतय याची माहिती नाहि त्यांच्या मनात जो संभ्रम निर्माण होतोय "त्यांची काय चुक" ??? जर काहि लोक या...