शिवमय दिवाळी पहाट - २००१४

शिवमय दिवाळी पहाट - २००१४ कोण म्हणत ४ चांगली माणस एकत्र येत नाहीत… त्याला जाउन सांगा कोणीतरी !! ४ चांगली माणस एकत्र येतात जर त्यांच धेय्य आणि हेतू स्वच्छ असेल तर ते निस्वार्थीपणे एकत्र येतात. काल रात्री १० ते १०:३० च्या दरम्यान अजित दादांचा फोन आला उद्या सकाळी बाजीप्रभू चौक डोंबिवली (पूर्व) येथे आपल्या जायचंय. तिथे आपल्या छोटासा "दीपोत्सव" साजरा करायचा आहे. पण इतक्या उशिरा पोस्ट टाकली तर कोण येईल का?? मुख्य म्हणजे कोणी ती पोस्ट वाचेल का? हा प्रश्न उभा राहिला पण नंतर त्या प्रश्नाच उत्तर शोधण्याच्या फंदात न पडता पहिली फेसबुक ला पोस्ट टाकली नंतर मिळेल ते सामान bag मध्ये भरून घेतले. आता मुख्य मुद्दा होता सकाळी ४ वाजता उठायचा. मी एकदा झोपलो को "कुंभकर्ण" पण "फिका" पडेल माझ्या समोर म्हणून फारशी रिस्क न घेता रात्रभर जाग राहायचं ठरवलं. सकाळी अजित दादांशी फोना-फोनी करून निघालो थेट भेट झाली ती बाजी प्रभू चौकात तिथे अजित दादांनी अगोदरच कामाला सुरुवात केली होती. मी हि त्यांच्या सोबत सुरुवात केली तोवर हळू हळू एक एकजण जमा होऊ लागले जो तो मिळेल ते काम करत होता. ...