"१ मे महाराष्ट्र दिन "

"महाराष्ट्र" या अद्भुत सह्याद्रीचे एक रूप……… जितके सुंदर तितकेच रौद्र. या मातीत जितके संत-महात्मे जन्माला आले तितकेच जीव हातात घेऊन लढणारे वीर पहिले. महाराष्ट्राच्या "संयुक्त महाराष्ट्र" च्या चळवळीत उभ्या देशाने याची देही यांची डोळा पाहिली कि "मातीसाठी हुतात्मा" होणे म्हणजे काय? या महराष्ट्राच्या मातीतील १०६ वीरांनी आपले प्राण तळहातावर घेऊन महाराष्ट्र स्वतंत्र केला. १ मे १९६० हाच तो दिवस ज्या दिवशी या १०६ वीरांचे हौतात्म्य फळाला आले व आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. या १०६ हुताम्यांना भावपूर्ण आदरांजली…. व सर्व महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्रदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा…. जय महाराष्ट्र जय शिवराय दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/ मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे २१ नोव्हेंबर १९५५ / १६, १७, १८, १९, २० जानेवारी १९५६ १] सिताराम बनाजी पवार २] जोसेफ डेव्हिड पेजारकर ३] चिमणलाल डी. शेठ ४] भास्कर नारायण कामतेकर ५] रामचंद्र सेवाराम ६] शंकर खोटे ७] धर्माजी गंगाराम नागवेकर ८] रामचंद्र लक्...