ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना ! झाकलेले डोळे अन मिटलेले ओठ, पहावत नाहीयत मला, तुझ्या या चेह-यावरचे निर्जीव भाव सोसवत नाहीयत मला… ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना ! तुझ भांडण हि मान्य, तुझ रागावण हि मान्य, पण तुझ हे निपचीत पडणं, पहावत नाहीय मला ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना ! ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना !! दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/
तो…………. तो फक्त उभा राहिला कि सगळे कागदी शेर कानाकोप-यात पळावे…… त्याने Bat उचलावी ती शतक झळकविण्यासाठी अशी भाबडी आशा प्रत्येकाने बाळगावी …. त्याने टायमिंग आणि कलाई च्या सहाय्याने असे फटके मारावेत कि गोलंदाजानेहि दाद द्यावी…. विकेट मिळत नाही म्हणून त्याला डिचवायच्या नादात गोलंदाजाने स्वताच हसं करून घ्यावं…. तो नव्वदीत बाद झाला म्हणून लहान थोरांनीही आकांत-तांडव कराव…… तो मैदनात येताना आणि मैदानातून जाताना एकच आवाज यावा… सचिन……… सचिन ………… सचिन ………. पण यापुढे कधीच नाही…………………… दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/
मोहीम तोरणा ते राजगड भाग - १ माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त दिवस चालेलेली दुर्गदर्शन मोहीम दि. 2 नोव्हेंबर 2013 ते 4 नोव्हेंबर 2013 ठरल्याप्रमाणे १ नोव्हेंबर रोजी रात्री आम्ही एस टी महामंडळ ने निघणार होतो. कोणी म्हणायचं १००० ची गाडी आहे कोणी म्हणायचं १०:३० ची गाडी पण होती ११:१५ ची ते चालायचं. मी नितीन, प्रशांत, योगेश, राज, सुरज, प्रीतेश आम्ही "नेहमीप्रमाणे" वेळेपूर्वीच परेल डेपोत हजर झालो. गडावर मशाल पेटवायची त्यासाठी लागणार ऑईल कुणीच आणल नव्हत त्यामुळे डेपोत कुणी ऑईल देत का त्याची विचारपूस मी व प्रशांत बंधुनि सुरु केली. आपला निभाव काही लागत नाही आणि आपल्याला ऑईल काही मिळत नाही अस वाटल्यावर आम्ही परतत होतो तेवढ्यात एका एस टी महामंडळ च्या कर्मचा-याने आम्हाला हाक मारून बोलावले आणि ऑईल सुपूर्द केले नेहमीप्रमाणे आम्हाला या शिवकार्यात आमच्या अडचणीला कोणी न कोणी उभा राहतो याचा पुन्हा प्रत्यय आला. ऑईल मिळाल्याच्या आनंदात आम्ही आम्ही बाकी दुर्गवीरांच्या सोबत परतलो. इकडे पाहतो तर काय प्रशांत अधटराव व अनिकेत तमुचे यांचा पत्ता नाही.अखेर प्रशांत अधटराव प...