(अखंड) महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.... (चार आणे पडलेल्या अणेच्या नाकावर टिच्चून)





(अखंड) महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा..... (चार आणे पडलेल्या अणेच्या नाकावर टिच्चून)


ब-याच दिवसांपासुन कुणीतरी १ आण्याची किंमत नसलेल्या "अणे" नावाच्या विकृत माणसाची बडबड ऐकतोय!! काय तर म्हणे स्वतंत्र विदर्भ हवा यासाठी महाराष्ट्राच्या नकाशाच्या आकाराचा केक कापणे, स्वतंत्र विदर्भाचा नकाशा, झेंडा तयार करणे पासुन महाराष्ट्र दिनाच्या विरोधात घोषणा देणे वगैरेंसारखी नौटंकी करण्याइतपत यांची मजल गेलीय. आणि आपल सरकार का यांचा "माज" सहन करतय कुणास ठावुक !!

एका बाजुला बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी पिढ्यांच्या पिढ्या आपले सर्वस्व अर्पण करीत असताना दुसरीकडे ही स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारी लांडग्यांची औलाद किती हा विरोधाभास !!

स्वतंत्र महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करणारे ते १०६ आत्मे नक्कीच हळहळत असतील एक दिवस हेच दिवस पाहण्यासाठीच का हे बलिदान दिले होते असा प्रश्न त्यांना नक्की पडला असेल !!

इकडे बेळगावात कर्नाटक सरकार करत असलेले अत्याचार सहन करुनही महाराष्ट्रातच येण्यासाठी धडपडणा-या गेल्या अनेक पिढ्या आणि सध्याची तरुणाई या सर्वांना नक्की प्रश्न पडला असेल ह्याच महाराष्ट्रात आपण सामील व्हाव म्हणुन लढतोय ज्याच्या दुस-या टोकाला राजकीय लालसेपोटी स्वतंत्र विदर्भच्या नावाखाली महाराष्ट्राचा लचका तोडायचा प्रयत्न केला जातोय !!!
विदर्भात प्रगती होत नाही हे वास्तव नाकारुन चालणार नाही पण स्वतंत्र राज्य हा त्यावरचा पर्याय नक्किच नाही. स्वतंत्र विदर्भाच्या लढ्याला भावनिक बनवुन रक्तरंजित करण्याचा डाव हे राजकीय नेते मांडत आहेत. देव त्यांचा डाव उधळुन लावो.. नाहीतर आज महाराष्ट्राच्या किंबहुना विदर्भाच्या जनतेला स्वत:हुन हा "राजकीय डाव" उधळुन लावायची गरज आहे.

आज अणे सारख्यांची राजकीय लालसा आणि भाजप सरकारचा राजकीय दुटप्पीपणा यामुळे या प्रकरणाला खतपाणी घातले जातेय हे या महाराष्ट्राच्या जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल.

आज त्या तमाम १०६ हुतात्म्यांची आणि बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडणा-या महाराष्ट्राती शुर वीरांची आज महाराष्ट्रात "जे" चाललय त्याबद्दल "हात जोडुन" माफी मागावी अस वाटतय !!!

पण एक वचन मात्र नक्की देतो तुमच हे बलिदान व्यर्थ जावु देणार नाही....... हा महाराष्ट्रात अखंड होता आणि अखंडच राहील
जय महाराष्ट्र !!
जय शिवराय !!
पुन्हा एकदा (अखंड) महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा  (चार आणे पडलेल्या अणेच्या नाकावर टिच्चून)

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….