दुर्गवीर सोबतची माझी 2 वर्ष
दुर्गवीर सोबतची माझी २ वर्ष नुकतेच २६ फेब्रुवारी २०१३ येउन गेला तसा हा दिवस इतरांसाठी सामान्य पण बरोबर २ वर्षापूर्वी दि. २६ फेब्रुवारी २०१२ रोजी माझी भेट दुर्गवीरांशी झाली. नितीन पाटोळे बंधूनी फेसबुक वर केलेले आवाहन (आव्हान) स्वीकारून मी दुर्गवीर च्या सूरगड मोहिमेत सहभागी झालो. पहिल्यांदा अनेक प्रश्न मनात होते कोण असेल दुर्गवीर, श्रमदान म्हणजे नेमक काय करीत असतील असे आणि अनेक…. पण जसजसा मी दुर्गवीर सोबत वेळ घालवत गेलो तसे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. दुर्गवीर सोबतच पाहिलं श्रमदान सुरगडावर त्यावेळी मनात एक उर्मी होती मनात काहीतरी करून दाखविण्याची. मोनीश चौबळ, चंद्रशेखर पिलाने ह्यांची सुद्धा हि पहिली मोहीम होती. अपेक्षेप्रमाणे मला तिथे फक्त हे "शिवकार्य" आपले "कर्तव्य" मानणारी माणसे भेटली. प्रत्येकजण आपल्या वाटेला आलेले काम ईर्षेला पेटून करत होता. कुणाच्या मनात कुठला अहंकार नाही कि गर्व कि मोठा नि तो लहान सर्व एकत्र येवून काम करत होते. जसे काम एकत्र तसेच नाशिककरांनी बनविलेली खिचडी पण मनापासून खात ती मोहिमे पार पडली. त्या मोहिमेनंतर फारश्या मोहिमा ...