ध्यास गडसंवर्धनाचा आणि ध्यास शिक्षणाचा

ध्यास गडसंवर्धनाचा आणि ध्यास शिक्षणाचा या फोटोत दिसणा-या दोन व्यक्ती आजवरच्या माझ्या आयुष्यातील २ वेगवेगळ्या क्षेत्रातील आदरणीय / आदर्श व्यक्ती. प्रथम दोन्ही व्यक्तींची ओळख डावीकडील संतोष दादा दुर्गवीर प्रतिष्ठान (परिवार) चे अध्यक्ष पण ते आमच्या सर्व दुर्गवीर आणि वीरांगणांसाठी "संतोष दादा" आणि उजवीकडील श्री. धन्वी सर घेरासुरगड च्या पायथ्याशी असलेल्या खांब गावातील "नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री रामचंद्र गणपत पोटफोडे (मास्तर) विद्यालय, खांब" या शाळेतील एक शिक्षक प्रथम संतोष दादा बद्दल, माझी आणि संतोष दादाची पहिली भेट २६ फेब्रुवारी २०१२ सुरगड मोहिमेच्या वेळी. आदल्या रात्री म्हणजे २५ फेब्रुवारी २०१२ रोजी रात्री संतोष दादा मारुती मंदिरात दुस-या दिवशीच्या मोहिमेत काय काय काम करायचं हे सांगत होता. ते ऐकताना मला स्वताला जाणवत होत कि, बस हेचे ते शिवकार्य जे आपल्याला आता आयुष्यभर करायचं आहे. दादाचा एक एक शब्द मी मन लावून ऐकत होतो. त्याच्या बोलण्यात अस कुठे जाणवत नव्हत कि आपल्...