Posts

Showing posts from January, 2014

गड आला…… पण

Image
गड आला…… पण धाय मोकलून रडला… उमेदीच्या काळात जो रक्ताने न्हाला आज तो अश्रूंच्या डोहात बुडाला गड आला ……. पण धाय मोकलून रडला…… जो होता साक्षी तोफा अन तलवारीला आज तो भ्यायलाय बाजारबुणग्यांच्या शर्यतीला गड आला ……. पण धाय मोकलून रडला…… अभेद्य अन अफाट जो परिचित जगताला आज कोण हात देईल ह्या बुडत्याला गड आला ……. पण धाय मोकलून रडला…… #दुर्गवीर  चा  #धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/  

एक आठवण जुनी……

Image
सहजच जुन लिखाण चाळताना दुर्गवीर सोबतच्या एका मोहिमेचे लिखाण सापडलं ते आज तुमच्या समोर मांडतो. दुर्गवीर सोबत मी खूप गडदर्शन, श्रमदान मोहिम केल्या पण प्रत्येक मोहिमेचा एक वेगळा अनुभव असतो, त्यातील एक अनुभव म्हणजे दि. ७ ऑक्टोबर २०१२ च्या "सुरगड श्रमदान" मोहिमेचा अनुभव. तस पाहता गणेश उत्सवातल्या दीर्घ विश्रांती नंतर ती माझी पहिलीच श्रमदान मोहीम होती त्यामुळे माझा उत्साह तर "उसेन बोल्ट" पेक्षा वेगाने वाहत होता. ("उसेन बोल्ट" नाही माहित जाऊदे तुम्ही "पी. टी. उषा" अस समजा.) तर माझा उत्साह "पी. टी. उषा" पेक्षा वेगाने वाहत होता. कधी एकदा गडावर जातोय आणि काम करतोय अस झालेलं. त्या "शनिवारी" मला चक्क "सुट्टी" असल्यामुळे आम्ही शनिवारी सकाळी निघणार होतो. जाणारे आम्ही "इन मीन साडे तीन" होतो. त्यात १ मी, २ संतोष दादा, ३ सचिन रेडेकर आणि उरलेला आमचा महेश दादा. बाकीचे दुर्गवीर काम - धाम निपटाके रात्रीच्या ८ च्या गाडीने येणार होते. अगोदर क्वालीस ने जायचं ठरलेलं मग ते Cancel करीत सकाळच्या दिवा Passenger ने जायचं ठरलं.

विश्वास..

Image
त्यांच्याशी कधीच खोट बोलू नका ज्यांनी तुमचा खोटेपणा कधीतरी पाठीशी घातलाय http://dhiruloke.blogspot.in/

पुनच्छ पद्मदुर्ग दर्शन

Image
पुनच्छ पद्मदुर्ग दर्शन…… आज ब-याच कालावाधीनंतर पुन्हा पद्मदुर्ग चे दर्शन होणार म्हणून उत्सुकता होती. नेहमीप्रमाणे सुरुवात झाली दादर स्वामी नारायण मंदिरापासून तिथे सर्व एकत्र जमलेले मी थोडा लेटच पोहोचलो होतो (हिरो ची इंट्री उशिरा होते अस ऐकल होत कुठेतरी). भेटल्यावर जय शिवराय, जय शिवराय जयघोषात आम्ही सर्व दुर्गवीर बंधू एकमेकांची भेट घेऊ लागलो. नंतर काही वेळातच आमचा बसचा प्रवास(खरच "बस आत्ता" असा म्हणायला लावणारा प्रवास) या वेळी अपेक्षेपेक्षा जास्त दुर्गप्रेमींनी या पद्मदुर्ग मोहिमेस हजेरी लावल्याने मला हवी असलेली "विंडो सीट" हातातून जाणार हे मी अगोदरच माझ्या "दिव्य दृष्टीने" जाणले होते. मुंबई विभागातून तब्बल ४० च्या आसपास दुर्गप्रेमी या मोहीमेत सहभागी झाल्याने माझी Transfer स्वित्झर्लंड वरून राजस्थान मध्ये होणार हे पक्क होत त्यानुसार जेव्हा मी "बस" मध्ये "घुसलो" ते थेट बसच्या "शेवटच्या सीटवर" "बसलो". (ह्यालाच म्हणतात स्वित्झर्लंड वरून राजस्थानला Transfer) असो मग रात्रभर आमच "गरीब बिचार शरीर" वेगवेगळ

शायरी

Image
कुछ पाने के लिये, कुछ खोना पडता है ये कहता है जमाना सदियों से तुम पा लो वो सारी खुशिया जो मिल सके इस नाचीज को गवांने से दुर्गवीर चा धिरु http://dhiruloke.blogspot.in/