Posts

Showing posts from April, 2013

हिंदू ........

Image
मान हिंदू , अभिमान हिंदू ।।  या देशाची शान हिंदू, ।। भगव्याचा पाईक हिंदू ।। या भगव्यास फडकवे हिंदू ।।  या म्लेच्छाचा काळ हिंदू  ।। स्वराज्याचा तारणहार हिंदू ।।  या तलवारीची पात हिंदू  ।।  गनिमावर वज्रघात हिंदू  ।।  आगीची ललकार हिंदू  ।।  वा-याची रफ्तार हिंदू  ।।  सागराहून उत्स्फूर्त हिंदू  ।।  आभाळाहुनी अफाट हिंदू ।।  दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/     

एक तरुण चाळीशीतला (मा. सचिन रमेश तेंडूलकर )

Image
एक तरुण चाळीशीतला (मा. सचिन रमेश तेंडूलकर )  तो आला…. उंची होती साधारण ५ फुट(कदाचित त्यापेक्षा कमी ) वय अवघ १६ ते १७ अगदीच शिडशिडीत बांध्याचा, कुरळ्या केसाचा एक छोटासा मुलगा आला अगदी आत्मविश्वासाने, डोक शांत ठेवून खेळला. आणि हा हा म्हणता सर्व जगाला आपलस करू लागला.  जसजसे वर्ष उलटत गेली तस तसा तो विक्रम रचवू लागला. आणि आज तेवीस वर्षानंतर तो चाळीशीत पोचला तोवर अनेक फलंदाजांचा तो आदर्श आणि गोलंदाजांचा काळ बनलाय…  अश्या ह्या महान फलंदाजाला क्रिकेटच्या देवाला माझा मानाचा मुजरा…  आणि वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा।  दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/  

सुसाट… भन्नाट… वेगात…

Image
सुसाट… भन्नाट… वेगात…  गेल्या वर्षभरात मी दुर्गवीरांना आणि वीरांगणांना श्रमदान करताना पाहत आलो सगळे अगदी जोमाने श्रमदान करायचे मग ते काम पायवाटेचे असो वा पाण्याच्या टाक्यांच दुर्गवीर आणि वीरांगणा नेहमी सेवेच्या ठायी तत्पर… पण आज प्रथम बाईक वर सुसाट…  भन्नाट…  आणि वेगात…   असलेले दुर्गवीर आणि वीरांगणा पहिले.  औचित्य होत "गुढीपाडवा / नववर्ष निमित्त मुंबई ते उंबरखिंड स्वागत फेरी"…  तसे नेहमी ट्रेन किंवा महेश दादाची गाडी (विमान) घेऊन जाण श्रमदान करण आणि श्रमदान करून परत येण  हा आमचा नेहमिच्या मोहिमांचा उपक्रम पण आजची मोहीम काही वेगळीच होती. आम्ही सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून पनवेल ला एकत्र येणार होतो. मी, अजित दादा, प्रशांत दादा, ओजास्विनी ताई, संतोष दादा ठाणे ला भेटून पनवेल ला पोचलो तिथे अगोदर काही जण पोचले होते. नेहमीप्रमाणे आमच्या महेश दादाच विमान उशिराने सुटल त्यामुळे आम्ही सर्वजन पनवेल ला त्याच विमान यायची वाट पाहत होतो. सगळे जमा झाले.  नंतर नारळ फोडून मोहिमेला सुरुवात झाली. सर्वांनी आपापल्या बाईक ला भगवे झेंडे बांधले (ज्यांच्याकडे आपली बाइक नव्हती त्यांनी  ते झेंडे  

"आई"

Image
हो आहे ना माझी मैत्रीण!!!! जी सतत माझी काळजी करते  कुणावर नाही इतक माझ्यावर प्रेम करते  माझ्यासाठी नेहमीच ती झुरते  माझ्या काळजीत सतत ती तडफडते  माझ्या प्रत्येक क्षणावर बारीक लक्ष ती ठेवते  सतत मला हव-नको ते बघते  माझ्या चांगल्याची स्तुती ती करते  चुकलोच कधी तर प्रेमाने ती फटकारते दुख माझे तिला न सांगताच कळते  मला दुखी पाहून तीहि हळहळते सारे जग तिला "आई" म्हणून ओळखते… दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/  

हसताही येत मला......

Image
हसताही येत मला…  अगदीच नाही अस समजू नका बघत असलो रागात तरी  रागीट मला समजू नका  खळखळून नाही हसलो कधीच  तरी मिशीत जरासा हसतो मी  दुस-यांच्या हसण्यातच  माझा आनंद शोधतोय मी  धुंदित असतो मी कधी कधी  पण शिवकार्याच्या धुंदित रमतो मी  ह्या भगव्याची आन मजसी  या शिवकार्यासाठीच मातीत मिसळेन मी  जय शिवराय  दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/   (फोटो साठी खास आभार कु. शैलजा जोगल )

"दर्शन धाकल्या धन्याच- मोहीम वढू-तुळापुर"

Image
प्रथम तुम्ही माझ्या पहिल्या लेखाला (काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर) उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आता दुसरा भाग "दर्शन धाकल्या धन्याच- मोहीम वढू-तुळापुर" शिवजयंतीचा उत्सव उत्साहात पार पडला. आता तयारी सुरु झाली मोहीम वढू-तुळापुरची. तस माझ मोहीम वढू-तुळापुर ला जाणं जवळपास रद्द झालेलं कारण रविवारी Audit होत. पण माझ मन मला स्वस्थ बसू देत नव्हत. मला स्वताचाच राग येत होता. किती दिवसांपासून माझी इच्छा होती या २ पवित्र स्थानांना भेट देण्याची. मन सारख खात होत मला. खर तर शिवजयंतीच्या कार्यक्रमात माझ लक्षच लागत नव्हत. मी अक्षरशा रडकुंडीला आलो होतो. अधून मधून राज दादा मला सांगत होता "धीरु तू येतोयस", "मला बाकी काही सांगू नकोस तू येतोयस"… खूप विचार केला शेवटी ठरवलं जायचं मोहीम वढू-तुळापुर ला जायचं बाकी सर्व गेल उडत…आम्ही कसे निघालो तिथे काय अनुभवल हे मी या अगोदरच्या " (काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर)" या लेखात मांडलाय मी मुद्दामहून २ लेख लिहिले कारण आम्ही वढू-तुळापुर या दोन ठिकाणी जे अनुभवल ते अप्रतिमच होत.  आम्ही अजय दादांच्या घरून

काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर

Image
काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर [आमची वढू तुळापुर मोहीम सर्वच अर्थाने जबरदस्त झाली. काही हसरे तर काही मनाला चटका लावून जाणारे तर काही धाकल्या धन्याच्या आठवणीने मन हेलावून टाकणारे… हे सर्व अनुभव एका लेखात लिहीन मला योग्य वाटत नव्हत म्हणून मी याचे २ लेख लिहिले त्यातील पहिला "काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर" आणि दुसरा लेख "दर्शन धाकल्या धन्याच- मोहीम वढू-तुळापुर"…. यातील हा पहिला लेख तुमच्यासमोर आणतोय दुसरा लेख पुढील काही दिवसात नक्की येणार तोपर्यंत या लेखावरच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा… ]  शिवजयंती चा उत्सव उत्साहात पार पडला आणि आम्ही ७ जण वढू-तुळापुर ला जाणार होतो. त्यानुसार मी, राज मेस्त्री, नितीन पाटोळे, नील मयेकर, सचिन रेडेकर, सुरज कोकितकर, मोनीश चौबळ असे ७ निघालो. मी आणि राज दादा त्याच्या घरी जेवून निघालो. दादर स्टेशन ला नितीन,सुरज,नील,सचिन अगोदर पोचले होते. रात्री ११:४५ च्या दरम्यान ट्रेन होती चेन्नई एक्स्प्रेस. ट्रेन मध्ये गर्दी नसणार आपण आरामात झोपून जाणार या विचारात आम्ही होतो. ट्रेन आली नेमका जनरल डब्बा मागे आला पुन्हा आमची धावपळ डब्बा पडा

मन वेडेच असत ग...

Image
कोणावर तरी जीव लावलास  यात तूझे तरी काय चुकले  आपल्या परक्यांना ओळखण्यात घोळ केलास  हे कुठेतरी खटकले ज्यांच्या दुखात सामील झालीस  त्यांनीच दूर लोटले  "त्या" स्वार्थी मनाला आपले मानलेस  हे तरी कसे तुझ्या मनास पटले  मन वेडेच असत ग  त्याची समजून नेहमीच  काढावी लागते  समजूत काढता काढता सहज  त्या वेड्या मनाला फसवावे लागते बर केलस वेळीच ओळखलस  एकटेपणाला आपल मानलस  पण चूकशील पुन्हा तू जर, या एकटेपणाच्या नादात दुखाला कवटाळलस…  दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/