सुरगड.....Nothing Is Impossible




सुरगड.....Nothing Is Impossible

सुरगडाने आजवर खुप वेगवेगळे अनुभव दिले.. २०१२ साली दुर्गवीर मधला माझा प्रवास सुरु झाला तो याच सुरगडाच्या साथीने... गडावर भर पावसात रात्र काढण्याचा अनुभव याच सुरगडाने दिला.... गडावर अनवानी चालायच म्हणजे काय हा अनुभव तर मला सुरगडावर तब्बल ६ वेळा आलाय.......

याच सुरगडाने आज पुन्हा एक अनुभव दिला “Nothing Is Impossible” हा अनुभव मलाच नाहि आजच्या मोहिमेला असलेल्या प्रत्येकाला आला असेल.

सुरगड चढायला अत्यंत कठिन आहे अशा “अफवांना”😝 “जवळपास” बळी पडलेल्या “कल्पना निगडे” यांना ही अनुभव आला असेल “Nothing Is Impossible”.

पायाच दुखन घेवुनसुद्धा गड चढुन आणि वर जावुन काम करणा-या गितु ताईने सुद्धा हा अनुभव घेतला असेल “Nothing Is Impossible”.

२-३ वर्षानंतर गडदर्शन करणा-या हिमगौरी कुर्वे असो किंवा रसिका म्हानगोरे असो तुमची सुरगडची अवघड (?) घळ पार करुन वर जावुन काम करुन पुन्हा त्याच निसरड्या वाटेने गड उतरायची यांची जिद्ध आणि इच्छाशक्ती पाहुन मला हि आज अनुभव आला “Nothing Is Impossible”....

रायन डिसोजा आणि पंछी ह्या महाराष्ट्रीयन नसुन सुद्धा या गडांबद्दल असलेली "आस्था" पाहुन तुम्हालाही अनुभव येईल “Nothing Is Impossible”

महाराष्ट्र सरकार व पुरातत्व खाते यांच्या संयुक्त विद्माने दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित मानगड, मृगगड नंतर आज सुरगड च्या श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सतत ३ रविवार मोहिमा असल्याने या मोहिमेला कदाचित उपस्थित कमी असण्याची शक्यता होती परंतु उलट आजच्या मोहिमेला मुलींची जास्त उपस्थिती हा वाखाणन्याजोगा मुद्दा होता.

आजच्या मोहिमेत गडावरील देवीचे मंदिर, धान्यकोठार सदृष्य वास्तु आणि हनुमान मंदिर व लगतची पायवाट याचे काम करण्यात आले. गड चढणे-उतरणे असो वा गडावर रान काढुन वास्तु साफ करणे असो मुलींनी “हम भी कुछ कम नहीं” चा प्रत्यय दिला.

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….